Sunday, 18 September 2016

दिनविशेष

जून


१ जून - टाटा मुलभुत अनुसंधान संस्थेची स्थापना, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मृतिदिन, हेलन केलर      पुण्यतिथी.

२ जून -  अहिल्याबाई होळकर जयंती, संत मुक्ताबाई पुण्यतिथी.
३ जून – प्रसिध्द अभिनेते राज कपूर पुण्यतिथी.
४ जून – राष्ट्र सेवादल दिवस, शिवछत्रपती सुवर्णतुळा,विश्व निष्पाप बालक तथा आक्रमणपीडित दिन,   Martyrdom Day.
५ जून – जागतिक पर्यावरण दिन,ऑपरेशन ब्लु स्टार.
६ जून - गुरुदेव रानडे पुण्यति
१० जून – जागतिक दृष्टीदान दिन, नेत्रशल्यचिकीत्सक डॉ.के.भालचंद्र जन्म दिन.
११ जून – साने गुरुजी पुण्यतिथी, इतिहासाचार्य वासुदेवशास्त्री खरे पुण्यतिथी.
१२ जून - शिवराज्यभिषेक दिन.
१३ जून – महाराणा प्रताप जयंती, आचार्य प्र.के.अत्रे पुण्यतिथी.
१४ जून – संत कबीर जयंती, नाटककार गोविंद बल्लाळ देवल पुण्यतिथी.
१६ जून – बॅ.चितरंजन दास  पुण्यतिथी.
१७ जून – राजमाता जिजाऊ पुण्यतिथी, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
१८ जून –  झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी.
१९ जून – पेशवाईतील मुत्सद्दी हरीपंत फडके पुण्यतिथी.
२० जून – जागतिक स्वच्छता दिन,  पक्षी विशेषज्ञ डॉ.सलीम अली पुण्यतिथी, पितृत्व दिन.
२१ जून – डॉ.हेगडेवार पुण्यतिथी, महाकवी कालिदास जयंती.
२३ जून – डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी, नानासाहेब पेशवे पुण्यतिथी, बालशिक्षण तज्ज्ञ गिजुभाई बधेका पुण्यतिथी, भारतीय नभोवाणीची सुरुवात.
२६ जून – जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस, संतनिवृत्तीनाथ पुण्यतिथी
 ३० जून – महि कालिदास दिवस, दादाभाई नौरोजी पुण्यतिथी.


जुलै

 १ जुलै – महाराष्ट्र कृषि दिवस, ग.श्री. तथा दादासाहेब खापर्डे पुण्यतिथी, डॉ.बी.सी. रॉय पुण्यतिथी.
 १ जुलै ते ७ जुलै  - वन महोत्सव.
 ४ जुलै – स्वामी विवेकानंद पुण्यतिथी, सेना सरखेल सरदार कान्होजी आंग्रे पुण्यतिथी
 ५ जुलै – रहस्यकार बाबुराव अर्नाळकर पुण्यतिथी, आझाद हिंद सेनेची स्थापना.
 ६ जुलै – आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय पुण्यतिथी, जागतिक संसर्गरोग निवारण दिन, युवा  उद्योजक दिन.
 ९ जुलै – कविवर्य बा.भ. बोरकर पुण्यतिथी,  प्रा. शं. वा. दांडेकर पुण्यतिथी, वाघ राष्ट्रीय प्राणी घोषित.
 १० जुलै - मातृ सुरक्षा दिन
 ११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिवस, मिर्झाराजे जयसिंग पुण्यतिथी.
 १२ जुलै – पानशेत प्रलय दिन
 १३ जुलै – ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं.के.जी. गिंडे पुण्यतिथी, आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी.   मोलस्वर्थ पुण्यतिथी
१४ जुलै – वासुदेवानंद सरस्वती पुण्यतिथी, संगीतकार मदनमोहन पुण्यतिथी.
 १५ जुलै – बालगंधर्वाची पुण्यतिथी, पं. जवाहरलाल नेहरुंना भारतरत्न
 १६ जुलै – तुलसीदास महाराज पुण्यतिथी, इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुण्यतिथी
 १८ जुलै – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी, मुंबई विद्यापीठाची स्थापना, नेल्सन मंडेला जन्मदिन
 १९ जुलै – बँक राष्ट्रीयकरण दिवस.
 २० जुलै – गोस्वामी तुलसीदास जयंती, रेडिओ शोधक मार्कोनी पुण्यतिथी, चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल 
 २२ जुलै – रस्ता सुरक्षा दिवस
 २३ जुलै – वनसंवर्धन दिन, चंद्रशेखर आझाद  जन्मदिन.
 २४ जुलै – लोकमान्य टिळक जयंती
 २५ जुलै – समाजिक न्याय दिन, राजे लखुजी जाधव पुण्यतिथी, गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका 
पुण्यतिथी, जिम कार्बेट जन्मदिन, जगातील पहिल्या टेस्टटयूब बेबीचा जन्म.
२६ जुलै – कारगिल विजय दिन, राजर्षि शाहू महाराज जयंती.
 २७ जुलै – संत नामदेव पुण्यतिथी
 २८ जुलै – संत सावतामाळी पुण्यतिथी
 २९ जुलै – जे.आर.डी. टाटा जन्मदिन
 ३० जुलै – संत तुलसीदास पुण्यतिथी
 ३१ जुलै – क्रांतिकारक उधमसिंह पुण्यतिथी, जगनाथ ऊर्फ नाना शंकरशेठ पुण्यतिथी, मुन्शी प्रेमचंद       
जन्मदिन.



ऑगस्ट

 १ ऑगस्ट – अण्णाभाऊ साठे जयंती, लो. टिळक पुण्यतिथी, असहकार चळवळ दिन.
 २ ऑगस्ट – अलेक्झांडर ग्रॅहम बेल पुण्यतिथी
 ३ ऑगस्ट – क्रांतिसिंह नाना पाटील जयंती, आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
 ४ ऑगस्ट – संत तुलसीदास जयंती
 ५ ऑगस्ट – राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण दिन
 ६ ऑगस्ट – जागतिक शांतता दिन, हिरोशिमा दिवस, अणुबाँब निषेध दिवस,  स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव पटवर्धन पुण्यतिथी, ग्रंथकार कृष्णशास्त्री राजवाडे पुण्यतिथी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुण्यतिथी
 ७ ऑगस्ट – रविंद्रनाथ टागोर पुण्यतिथी
 ९ ऑगस्ट – ऑगस्ट क्रांतिदिवस, नागासाकी दिवस
 ११ ऑगस्ट – खुदीराम बोस बलिदान दिवस, मादाम कामा पुण्यतिथी
 १२ ऑगस्ट  - संस्कृत दिवस,  विक्रम साराभाई जन्मदिन, आगगाडीचा जनक जॉर्ज स्टीफन्स पुण्यतिथी,   पहिली जागतिक मराठी परिषद
 १३ ऑगस्ट – अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
 १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन, रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी
 १६ ऑगस्ट – वीराचार्य बाबासाहेब कचनुर पुण्यतिथी
 १८ ऑगस्ट – नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी, विश्व भूमिपुत्र दिन
 १९ ऑगस्ट – फ्रेंच गणितज्ज्ञ पास्कलची पुण्यतिथी
 २० ऑगस्ट – लोकशक्ती दिन, सद्भावना दिन, श्री. संत ज्ञानेश्वर जयंती, राजीव गांधी जयंती
 २३ ऑगस्ट – बॉम्बे असोसिएशनची स्थापना
 २४ ऑगस्ट – संत सेना महाराज पुण्यतिथी
 २५ ऑगस्ट – आझाद हिंद सेनेची स्थापना
  २७ ऑगस्ट -  मदर टेरेसा जयंती
 २८ ऑगस्ट – चक्रधर स्वामी जयंती
 २९ ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिवस
 ३० ऑगस्ट – क्रांतिवीरांना अरुणा असफअलीची पुण्यतिथी
 ३१ ऑगस्ट – छावाकार सावंत जयंती,  शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक पुण्यतिथी



सप्टेंबर

 १ सप्टेंबर – गजानन महाराज पुण्यतिथी
 २ सप्टेंबर – कल्पवृक्ष दिन, ज्ञानपीठ विजेते वि.स. खांडेर पुण्यतिथी
 १ ते ७ सप्टेंबर – National Nutrition week
 ४ सप्टेंबर – दादाभाई नौरोजी यांचा जन्मदिन
 ५ सप्टेंबर -  शिक्षक दिवस, संस्कृत दिन, डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिन,  मदर टेरेसा पुण्यतिथी
 ७ सप्टेंबर – वेद  दिन
 ८ सप्टेंबर – जागतिक साक्षरता दिवस, थिरु ओनम दिन, पहिला भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉ.कमला   सोहोनीची पुण्यतिथी
 ९ सप्टेंबर – हुतात्मा शिरिषकुमार पुण्यतिथी
 १० सप्टेंबर – आचार्य विनोबा भावे जयंती, कवी अनिल यांना जन्मदिन
 ११ सप्टेंबर -  प्रसिध्द हिंदी कववित्री महादेवी वर्मा पुण्यतिथी
 १२ सप्टेंबर -  मराठी साहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे पुण्यतिथी
 १३ सप्टेंबर – बाबा परमानंद पुण्यतिथी, क्रांतिकारक जतींद्रनाथ दास पुण्यतिथी
१४ सप्टेंबर – हिंदी दिवस, डॉ. रामकुमार वर्मा यांचा  जन्मदिन
 १५ सप्टेंबर – अभियंता दिवस, विश्वकर्मा दिवस, विश्वेश्वेरैया जयंती
 १६ सप्टेंबर – कामगार शिक्षण दिवस, शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन, विश्व ओझोन संरक्षण दिन,   जयवंत दळवी पुण्यतिथी
१७ सप्टेंबर -  हैद्राबाद मुक्ति संग्राम दिवस, मराठवाडा  मुक्ति दिवस
२० सप्टेंबर – संत गुलाबराव महाराज पुण्यतिथी, डॉ.अॅनी बेझंट पुण्यतिथी, जागतिक स्वच्छता दिन
२० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर – स्वच्छता पंधरवडा
 २१ सप्टेंबर – जागतिक अंधश्रध्दा निर्मूलन दिवस, शांतता तथा अहिंसा दिन
 २२ सप्टेंबर – श्रम प्रतिष्ठा दिवस, गुलाबपुष्प दिन(कर्करोगग्रस्तांचे कल्याण), अयनदिन पृथ्वीवर दिवस- रात्र   समान
 २६ सप्टेंबर – कर्णबधीर दिन,   श्री.अग्रसेन महाराज जयंती, संत मुक्ताबाई जयंती, संत बहिणाबाई पुण्यतिथी
 २७ सप्टेंबर – जागतिक पर्यटन दिवस, राजाराम मोहनराय पुण्यतिथी
 २८ सप्टेंबर – जागतिक कर्णबधिर दिन,  भगतसिंह जयंती, प्रसिध्द संशोधक लुई पाश्चर पुण्यतिथी
 ३० सप्टेंबर – T.B. Seals Day, सास्तूर किल्लारी भूकंप 


ऑक्टोबर
१ ऑक्टोबर

 १ऑक्टोबर :   जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, जागतीक पक्षु कल्याण दिन, रक्त दान    

 दिवस, डॉ.अॅनी बेझंट यांचा जन्मदिन, दशमान पध्दतीची सुरुवात.

१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह

   १ ऑक्टोबर १७९१
:
फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू
  १ ऑक्टोबर १८३७
  १ ऑक्टोबर १८५४
:
:
भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
लॉर्ड डलहौसी यांच्या कारकीर्दीत भारताचे पहिले टपाल तिकीट छापले गेले.
  १ ऑक्टोबर  १८४७
:
अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय
स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन
केले होते. त्यांनी भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या
सुमारे ४५० इतकी आहे.

  १ ऑक्टोबर १८६८
:
मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचा स्मृतिदिन थायलंडचा राजा

  १ ऑक्टोबर १८८०
:
थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
  १ ऑक्टोबर १८८१
:
विल्यम बोईंग यांचा जन्म बोईंग विमान कंपनीचे संस्थापक

  १ ऑक्टोबर १८९१
:
स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना
  १ ऑक्टोबर १८९५
:
लियाकत अली खान यांचा जन्म पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान

 १ ऑक्टोबर १९०६
:
सचिन देव बर्मन यांचा जन्मसंगीतकार व गायक.

 १ ऑक्टोबर १९१९
:
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म गीतकार, कवी,
लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना महाराष्ट्राचे
वाल्मिकीम्हणून ओळखले जाते.

 १ ऑक्टोबर १९१९
:
मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
(१९९३) शायर, गीतकार आणि कवी.

 १ ऑक्टोबर १९२४
:
जिमी कार्टर  यांचा जन्मअमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक
विजेते

 १ ऑक्टोबर १९२८
:
विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्मदाक्षिणात्य अभिनेते

 १ ऑक्टोबर १९३०
:
जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म कर्नाटकचे १५ वे
मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९).

 १ ऑक्टोबर १९३१
:
शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचा स्मृतिदिननाट्यछटाकार

 १ ऑक्टोबर १९४३
:
दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
 १ ऑक्टोबर १९४६
:
युनायटेड किंग्डममधे मेन्सा इंटरनॅशनलया संस्थेची ची स्थापना झाली.
 १ ऑक्टोबर १९५८
:
भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
 १ ऑक्टोबर १९५९
:
भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार
सांभाळला.
  १ ऑक्टोबर १९६०
  १ ऑक्टोबर १९७८
 १ ऑक्टोबर १९९६
:
: 
:   
नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप यांचे निधन.
श्रीलंकेतील समाजशास्त्रज्ञ डॉ..टी. अरियरत्ने यांची १९९६ च्या गांधी शांतता
पुरस्कारासाठी निवड झाली.
 १ ऑक्टोबर १९९७

१ ऑक्टोबर १९९९

१ ऑक्टोबर २००१
:

:

:
गुल मोहम्मद यांचा स्मृतिदिन जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
राहूल गांधी यास सिएट क्रिकेट ऑफ द वर्ल्ड कप अॅवॉर्ड हे भारतासाठी देण्याचे निश्चित
स्वातंत्र्यसैनिक असलेल्या तसेच अरुणाचल प्रदेशाचे माजी गव्हर्नर असलेल्या सुरेंद्रनाथ द्धीवेदी यांचे निधन.

१ ऑक्टोबर २००५
:
इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.








२ ऑक्टोबर

२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिन,  महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती, बालसुरक्षा दिन, स्वच्छता दिन, गिनीचा स्वातंत्र्यदिन

 २ ऑक्टोबर  ९७१
:
गझनीचा महमूद यांचा जन्मदिवस
२ ऑक्टोबर १८४७
:
पॉल फॉन हिन्डेनबर्ग  यांचा जन्मदिवसजर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
२ ऑक्टोबर  १८६९
:
महात्मा गांधी जयंती
२ ऑक्टोबर  १८९१
:
विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्मदिवस शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४)
२ ऑक्टोबर  १९०४
:
लाल बहादूर शास्त्री जयंती स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर भारतरत्‍नसन्मानाने गौरविण्यात आले होते.
२ ऑक्टोबर  १९०६
:
राजा रविवर्मा स्मृतिदिनचित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)
२ ऑक्टोबर  १९०८
:
गंगाधर बाळकृष्ण तथा गं. बा.सरदार  यांचा जन्मदिवसविचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०)
 २ ऑक्टोबर १९०९
:
रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
 २ ऑक्टोबर  १९२५
:
जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
२ ऑक्टोबर  १९२७
:
पं. दिनकर कैकिणी यांचा जन्मदिवस  शास्त्रीय गायक
२ ऑक्टोबर  १९२७
:
स्वांते अर्‍हेनिअस स्मृतिदिन स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
२ ऑक्टोबर  १९४२
:
आशा पारेख यांचा जन्मदिवस  चित्रपट अभिनेत्री
२ ऑक्टोबर  १९४८
:
पर्सिस खंबाटा यांचा जन्मदिवस  अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका
२ ऑक्टोबर  १९५५
:
पेरांबूर येथे इन्टिग्रल कोच फॅक्टरीसुरू झाली
 २ ऑक्टोबर १९५८
:
गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
 २ ऑक्टोबर १९६७
:
थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
२ ऑक्टोबर  १९६८
:
याना नोव्होत्‍ना यांचा यांचा जन्मदिवस झेक लॉन टेनिस खेळाडू
२ ऑक्टोबर  १९६९
:
महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, , १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
२ ऑक्टोबर  १९७१
:
कौशल इनामदार यांचा यांचा जन्मदिवस  संगीतकार व गायक
२ ऑक्टोबर  १९७५
:
के. कामराज स्मृतिदिन स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
२ ऑक्टोबर  १९८५
:
रॉक हडसन स्मृतिदिन  अमेरिकन अभिनेता
२ ऑक्टोबर  २००६
:
निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
३ ऑक्टोबर
३ ऑक्टोबर  १६७०
:
शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.
३ ऑक्टोबर  १७७८
:
ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
३ ऑक्टोबर  १८६७
:
एलियास होवे यांचे निधन  शिवणयंत्राचा संशोधक
                                              
३ ऑक्टोबर  १८९१
:
एडवर्ड लूकास पुण्यतिथी  फ्रेन्च गणिती
३ ऑक्टोबर  १९०३
:
स्वामी रामानंद तीर्थ जयंती हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ

३ ऑक्टोबर  १९०७
:
नरहर शेषराव पोहनेरकर  यांचा जन्मदिवस निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास'

३ ऑक्टोबर  १९१४
:
म. वा. धोंड यांचा जन्मदिवस टीकाकार

३ ऑक्टोबर  १९१९
:
जेम्स बुकॅनन यांचा जन्मदिवस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन  अर्थतज्ञ

३ ऑक्टोबर  १९२१
:
 रे लिंडवॉल यांचा जन्मदिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

३ ऑक्टोबर  १९३२
:
इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
३ ऑक्टोबर  १९३५
:
जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.
३ ऑक्टोबर  १९४९
:
जे. पी. दत्ता यांचा जन्मदिवस चित्रपट दिग्दर्शक

३ ऑक्टोबर  १९५९
:
दत्तात्रय तुकाराम तथा दत्तूबांदेकर ऊर्फ सख्याहरीपुण्यतिथी  विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
३ ऑक्टोबर  १९९०
:
पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
३ ऑक्टोबर १९९५
:
ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.
३ ऑक्टोबर  १९९९
:
अकिओ मोरिटा पुण्यतिथी सोनी कार्पोरेशनचे संस्थापक
३ ऑक्टोबर  २०१२
:
केदारनाथ सहानी पुण्यतिथी  सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर






४ ऑक्टोबर

४ ऑक्टोबर :  राष्ट्रीय एकात्मता दिवस, जागतिक प्राणी दिन, बौध्द धम्मचक्र प्रवर्त
                       दिवस, साईबाबा पुण्यतिथी.
४ ऑक्टोबर १६६९
:
रेंब्राँ पुण्यतिथी  डच चित्रकार
४ ऑक्टोबर १८२२
:
रुदरफोर्ड हेस यांचा जन्मदिवस  अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष
  ४ ऑक्टोबर १८२४
:
मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
 ४ ऑक्टोबर १८४७
:
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन.
 ४ ऑक्टोबर १९१३
:
सरस्वतीबाई राणे यांचा जन्मदिवस  शास्त्रीय गायिका
 ४ ऑक्टोबर १९१६
:
धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला  यांचा जन्मदिवसअर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती
 ४ ऑक्टोबर १९२१
:
मराठी रंगभूमीवरील सुप्रसिध्द गायक नट केशवराव भोसले यांचे निधन.
 ४ ऑक्टोबर १९२७
:
गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअरचे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
 ४ ऑक्टोबर १९२८
:
ऑल्विन टॉफलर यांचा जन्मदिवस अमेरिकन पत्रकार व लेखक
 ४ ऑक्टोबर १९३५
:
अरुण सरनाईक यांचा जन्मदिवस  मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक
 ४ ऑक्टोबर १९३७
:
जॅकी कॉलिन्स यांचा जन्मदिवस इंग्लिश लेखिका व अभिनेत्री
४ ऑक्टोबर १९४०
:
ब्रेनर पासयेथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
४ ऑक्टोबर १९४३
:
दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
४ ऑक्टोबर १९४७
:
मॅक्स प्लँक पुण्यतिथी  नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
४ ऑक्टोबर १९५७
:
सोविएत रशियाने स्पुटनिक-१हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
४ ऑक्टोबर १९५९
:
सोविएत रशियाच्या ल्युनिक-३या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.
४ ऑक्टोबर १९६६

४ ऑक्टोबर १९७५

४ ऑक्टोबर १९७७
:

:

:
अनंत अंतरकर पुण्यतिथी – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक
पुण्यातील लाल महालाजवळील उद्यानात राजमाता जिजाबाई यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण.
तत्कालिन भारताचे परराष्ट्रमंत्री व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे युनोच्या (संयुक्त राष्ट्रसंघ) आमसभेत प्रथमच हिंदीत भाषण झाले.
४ ऑक्टोबर १९८२
:
सोपानदेव चौधरी कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवीहे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
४ ऑक्टोबर १९८३
:
नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
४ ऑक्टोबर १९८९
:
संगीतभूषणपं. राम मराठे पुण्यतिथी संगीतकार, गायक व नट
दलाई लामा यांना ‘नोबेल पारितोषिक’ प्रदान.





ऑक्टोबर
५ ऑक्टोबर  १८६४
:
एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार
५ ऑक्टोबर  १८९०
:
किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्मदिवस तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते हरिजनचे संपादक होते.
५ ऑक्टोबर  १९१०
:
पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.
५ ऑक्टोबर  १९२२
:
शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्मदिवस शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार
५ ऑक्टोबर  १९२२
:
यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्मदिवस पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार
५ ऑक्टोबर  १९२३
:
कैलाशपती मिश्रा यांचा जन्मदिवस गुजरातचे राज्यपाल
५ ऑक्टोबर  १९३२
:
माधव आपटे  यांचा जन्मदिवस क्रिकेटपटू
५ ऑक्टोबर  १९५५
:
पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्सया कारखान्याचे उद्‍घाटन झाले.
५ ऑक्टोबर  १९६२
:
डॉ. नोहा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.
५ ऑक्टोबर  १९७५
:
केट विन्स्लेट यांचा जन्मदिवस इंग्लिश आभिनेत्री
५ ऑक्टोबर  १९८१
:
भगवतीचरण वर्मा यांचा मृत्यू हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक
५ ऑक्टोबर  १९८३
:
अर्ल टपर  यांचा मृत्यू – ’टपरवेअरचा संशोधक
५ ऑक्टोबर  १९८९
:
मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
५ ऑक्टोबर  १९९०
:
राजकुमार वर्मा यांचा मृत्यू  नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३).
५ ऑक्टोबर  १९९१
:
रामनाथ गोएंका यांचा मृत्यू – ’इन्डियन एक्सप्रेसवृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
५ ऑक्टोबर  १९९२
:
बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचा मृत्यू नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
५ ऑक्टोबर  १९९५
:
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कारज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर
५ ऑक्टोबर  १९९७
:
चित्त बसू  यांचा मृत्यू संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस
५ ऑक्टोबर १९९८
:
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारजाहीर
५ ऑक्टोबर  २०११
:
स्टीव्ह जॉब्ज  यांचा मृत्यू  अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक





ऑक्टोबर
६ ऑक्टोबर  १६६१
:
गुरू हर राय यांचा मृत्यू शिखांचे ७ वे गुरू
६ ऑक्टोबर  १७७९
:
माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन  यांचा यांचा जन्मदिवसस्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार.
६ ऑक्टोबर  १८९२
:
लॉर्ड टेनिसन यांचा मृत्यूइंग्लिश कवी
६ ऑक्टोबर  १८९३
:
मेघनाद साहा यांचा जन्मदिवस खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले.
६ ऑक्टोबर  १९०८
:
ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
६ ऑक्टोबर  १९१२
:
डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचा जन्मदिवस  अणू रसायन शास्त्रज्ञ, प्राध्यापक
६ ऑक्टोबर  १९१३
:
वामन रामराव तथा वा. रा.कांत  यांचा जन्मदिवसकवी.
६ ऑक्टोबर  १९१४
:
थोर हेअरडल यांचा जन्मदिवस नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक
६ ऑक्टोबर  १९२७
:
वॉर्नर ब्रदर्सचा जॅझ सिंगरहा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
६ ऑक्टोबर  १९३०
:
रिची बेनो यांचा जन्मदिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक
६ ऑक्टोबर  १९४३
:
डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचा जन्मदिवस संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
६ ऑक्टोबर  १९४६
:
विनोद खन्ना यांचा जन्मदिवस अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार
६ ऑक्टोबर  १९४६
:
टोनी ग्रेग यांचा जन्मदिवस इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक
६ ऑक्टोबर  १९४९
:
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
६ ऑक्टोबर  १९५१
:
विल केलॉग यांचा मृत्यू – ’केलॉग्जचा मालक
६ ऑक्टोबर  १९६३
:
पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
६ ऑक्टोबर  १९७२
:
सलील कुलकर्णी यांचा जन्मदिवस संगीतकार
६ ऑक्टोबर  १९७३
:
इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.
६ ऑक्टोबर  १९७४
:
व्ही. के. कृष्ण मेनन यांचा मृत्यू  भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी
६ ऑक्टोबर  १९७९
:
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार  यांचा मृत्यू इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी
६ ऑक्टोबर  १९८१
:
इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या
६ ऑक्टोबर  १९८१
:
अन्वर सादात यांचा मृत्यू  इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
६ ऑक्टोबर  १९८७
:
फिजी प्रजासताक बनले.
६ ऑक्टोबर २००७
:
जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
६ ऑक्टोबर  २००७
:
बाबासाहेब भोसले यांचा यांचा मृत्यू महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
६ ऑक्टोबर  २००७
:
एल. एम. सिंघवी यांचा मृत्यू लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत
                 ७ ऑक्टोबर





 ७ ऑक्टोबर   :  वन्य पशू दिन, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन.

७ ऑक्टोबर  १७०८
७ ऑक्टोबर  १७३१
:
:
गुरू गोविंद सिंग यांचा मृत्यू शिखांचे १० वे गुरू
सरखेल कान्होजी आंग्रे
७ ऑक्टोबर  १८४९
:
एडगर अ‍ॅलन पो यांचा मृत्यू अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी
७ ऑक्टोबर  १८६६
:
कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक यांचा जन्मदिवस.
७ ऑक्टोबर  १८८५
:
नील्स बोहर यांचा जन्मदिवस अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक
७ ऑक्टोबर  १९००
:
हाइनरिक हिमलर यांचा जन्मदिवस  जर्मन नाझी अधिकारी
७ ऑक्टोबर  १९०५
:
पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.
७ ऑक्टोबर  १९०७
:
प्रागजी डोस्सा यांचा जन्मदिवस गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
७ ऑक्टोबर  १९१२
:
७ ऑक्टोबर  १९१४
:
बेगम अख्तर यांचा जन्मदिवस गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.  
७ ऑक्टोबर  १९१७
:
विनायक महादेव तथा वि. म.कुलकर्णी यांचा जन्मदिवस कवी आणि बालकुमार-साहित्यिक
७ ऑक्टोबर  १९१९
:
महात्मा गांधींनी नवजीवनहे वृत्तपत्र सुरू केले.
७ ऑक्टोबर  १९१९
:
के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
७ ऑक्टोबर  १९३३
:
पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्सही कंपनी स्थापण्यात आली.
७ ऑक्टोबर  १९४९
:
जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना
७ ऑक्टोबर  १९५२
:
व्लादिमीर पुतिन यांचा जन्मदिवस - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष
७ ऑक्टोबर १९६०
:
आश्विनी भिडे यांचा जन्मदिवस -देशपांडे यांचा जन्मदिवस शास्त्रीय गायिका
७ ऑक्टोबर  १९७१
:
ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
७ ऑक्टोबर  १९७५
:
देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा मृत्यू कन्नड कवी व विचारवंत
७ ऑक्टोबर  १९७८
७ ऑक्टोबर  १९८३
७ ऑक्टोबर  १९९४
:
:
:
जहीर खान यांचा जन्मदिवस  भारताचा जलदगती गोलंदाज
पंजाबमध्ये राष्ट्रीय राजवट सुरु
चीनने त्यांची व्दितीय अणुस्फोट चाचणी लोपनॉर येथे यशस्वीरित्या
घेतली.
७ ऑक्टोबर  १९९८
:
भाऊसाहेब वर्तक यांचा मृत्यू काँग्रेसचे नेते, पद्मश्री
७ ऑक्टोबर  १९९९
:
उमाकांत निमराज ठोमरे यांचा मृत्यू साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय वीणाया दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
७ ऑक्टोबर  २००१
:
सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.
ख्रिस्त पूर्व ३७६१
:
हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस
८ ऑक्टोबर

 ८ ऑक्टोबर : भारतीय वायू सेना दिवस








८ ऑक्टोबर  १३१७
:
फुशिमी यांचा मृत्यू जपानचा सम्राट

८ ऑक्टोबर  १८५०
:
हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्मदिवस फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ

८ ऑक्टोबर  १८८८
:
महादेव मोरेश्वर कुंटे यांचा मृत्यू कवी व संस्कृतचे प्राध्यापक. राजा शिवाजीहे त्यांचे काव्य विशेष गाजले.

८ ऑक्टोबर  १८९१

८ ऑक्टोबर  १९०७
८ ऑक्टोबर  १९१९
:

:
:
शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्मदिवस उद्योजक, साहित्यिक व चित्रकार
मराठी साहित्यिक भाऊ धर्माधिकारी यांचा जन्म.
महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया हे नियतकालिक सुरु केले.

८ ऑक्टोबर  १९२२
:
गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्मदिवस संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.

८ ऑक्टोबर  १९२६
:
कुलभूषण पंडित तथा राजकुमारऊर्फ जानी यांचा जन्मदिवसजबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता

८ ऑक्टोबर  १९२८
८ ऑक्टोबर  १९३१
:
:
नील हार्वे यांचा जन्मदिवस ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू
सुप्रसिध्द मराठी साहित्यिक  उध्दव शेळके यांचा जन्म.

८ ऑक्टोबर  १९३२
:
इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्टद्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
८ ऑक्टोबर  १९३५
:
मिल्खा सिंग यांचा जन्मदिवस – ’द फ्लाइंग सिख

८ ऑक्टोबर  १९३६
:
धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद’ यांचा मृत्यूहिन्दी साहित्यिक.

८ ऑक्टोबर  १९३९
:
दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
८ ऑक्टोबर  १९५९
:
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिटपदवी घरी येऊन दिली.
८ ऑक्टोबर  १९६२
:
अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
८ ऑक्टोबर  १९६२
:
नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शिततो मी नव्हेचया नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
८ ऑक्टोबर  १९७९
:
‘लोकनायकजयप्रकाश नारायण यांचा मृत्यू स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान

८ ऑक्टोबर  १९८२
:
पोलंडने सॉलिडॅरिटीव इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
८ ऑक्टोबर  १९९६
:
गोदावरी परुळेकर  यांचा मृत्यू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली.

८ ऑक्टोबर  १९९८
:
इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी' यांचा मृत्यूदेवरुख येथील मातृमंदिरसंस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा

८ ऑक्टोबर  २००१
:
सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
८ ऑक्टोबर  २०१२
:
वर्षा भोसले यांचा मृत्यू पत्रकार व पार्श्वगायिका

 ९ ऑक्टोबर







 ९ ऑक्टोबर : जागतिक टपाल दिन




९ ऑक्टोबर  १७५७
:
चार्ल्स (दहावा) यांचा जन्मदिवस फ्रान्सचा राजा
९ ऑक्टोबर  १८०६
:
प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
९ ऑक्टोबर  १८५२
:
एमिल फिशर यांचा जन्मदिवस रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ
९ ऑक्टोबर  १८७६
:
पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्मदिवसबौद्ध धर्माचे अभ्यासक
९ ऑक्टोबर  १८७७
:
पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्मदिवसओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
९ ऑक्टोबर  १८९२
:
रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादीयांचा मृत्यू  पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.
९ ऑक्टोबर  १९१४
:
विनायक कोंडदेव ओक यांचा मृत्यू बालवाङ्‌मयकार.
९ ऑक्टोबर  १९५५
:
गोविंदराव टेंबे यांचा मृत्यू  हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक.
९ ऑक्टोबर  १९६०
:
विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथया नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
९ ऑक्टोबर  १९६२
:
युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.
९ ऑक्टोबर १९८१
:
फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
९ ऑक्टोबर  १९८७
:
गुरू गोपीनाथ यांचा मृत्यू कथकली नर्तक
९ ऑक्टोबर  १९९८
:
जयवंत पाठारे यांचा मृत्यू – ‘आह‘, ‘अनाडी‘, ‘अनुराधा‘, ‘छाया‘, ‘सत्यकाम‘, ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमालयांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक
९ ऑक्टोबर  १९९९
:
मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचा मृत्यू नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खूष होऊन त्यांना नूतन पेंढारकरहे नाव प्रदान केले.





१० ऑक्टोबर

















१० ऑक्टोबर 


१० ऑक्टोबर  १७३१
:


:

जागतिक मानसिक आरोग्य दिन, जागतिक मृत्यूदंड निषेध दिन, राष्ट्रीय टपाल दिवस

हेन्‍री कॅव्हँडिश यांचा जन्मदिवस हायड्रोजन आणि ऑरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ

१० ऑक्टोबर  १८४४
:
बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्मदिवस कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष

१० ऑक्टोबर  १८७१
:
शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्मदिवस निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक

१० ऑक्टोबर  १८९८
     :
 मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा मृत्यू गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक

१० ऑक्टोबर  १८९९
:
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिवसभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष.

१० ऑक्टोबर  १९०२
:
के. शिवराम कारंथ यांचा जन्मदिवस कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत

१० ऑक्टोबर  १९०६
:
रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्मदिवस लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. द गाईड’, ’द वर्ल्ड ऑफ नागराज’, ’वेटिंग फॉर महात्माइ. कादंबर्‍या, तसेच मालगुडी डेज’, ’ए हॉर्स अँड टू गोट्‌सइ. कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाले.

१० ऑक्टोबर  १९१३
:
पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.
१० ऑक्टोबर  १९१६


१० ऑक्टोबर  १९२४
:


:
डॉ. लीला मूळगांवकर यांचा जन्मदिवस सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक
हॉकीपटू बलबीर सिंग यांचा जन्म. गोल्डन हॅट्ट्रीक या पुस्काचे लेखक, पद्मश्री किताबाने सन्मानित.

१० ऑक्टोबर  १९५४
:
आचार्य अत्रे निर्मित श्यामची आईचित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.
१० ऑक्टोबर  १९५४
:
रेखा यांचा जन्मदिवस चित्रपट अभिनेत्री

१० ऑक्टोबर  १९६०
१० ऑक्टोबर  १९६२
:
:
विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुलाया नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
चीनचे भारतावर आक्रमण
१० ऑक्टोबर  १९६४
:
जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१० ऑक्टोबर  १९६४

१० ऑक्टोबर  १९७०
:

:
वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरू दत्त यांचा मृत्यूप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते.
फिजी बेटे स्वतंत्र झाली.

१० ऑक्टोबर  १९८३


१० ऑक्टोबर  १९८४
:


:
रुबी मायर्स ऊर्फ सुलोचनायांचा मृत्यू मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री, पाणीदार व बोलक्या डोळ्यांमुळे त्यांना सुलोचना हे टोपणनाव पडले, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या
पहिली आंतरराष्ट्रीय बौध्द धर्म व राष्ट्रीय संस्कृती परिषद दिल्ली येथे सुरु.

१० ऑक्टोबर १९९८
:
आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१० ऑक्टोबर  २०००
:
सिरीमाओ बंदरनायके यांचा मृत्यू श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.

१० ऑक्टोबर  २००६
:
सरस्वतीबाई राणे यांचा मृत्यू शास्त्रीय गायिका

१० ऑक्टोबर  २००८
:
रोहिणी भाटे यांचा मृत्यू कथ्थक नर्तिका


१० ऑक्टोबर  २०११
:
जगजीतसिंग यांचा मृत्यू गझलगायक 



११ ऑक्टोबर

 

११ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय कन्या दिवस




११ ऑक्टोबर १७३७
११ क्टोबर  १८५२
:
:
 कोलकत्ता शहरास प्रलयंकारी तुफानाचा फटका.
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
११ क्टोबर १८७६
:
चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा जन्मदिवस बंगाली कथालेखक व कादंबरीकार.प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यूइ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
११ क्टोबर १८८९
:
जेम्स प्रेस्कॉट ज्यूल  यांचा मृत्यू ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक .
११ क्टोबर १९०२
:
लोकनायकजयप्रकाश नारायण यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान .
११ क्टोबर  १९१६
:
चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्मदिवस समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ - १९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले.
११ क्टोबर  १९१६
:
रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्मदिवस चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील यमुनाजळी खेळू ...या गाण्यासाठी प्रसिद्ध.
११ क्टोबर  १९३०
:
बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बीयांचा जन्मदिवस  पत्रकार व स्तंभलेखक
११ क्टोबर  १९३२
:
सुरेश दलाल यांचा जन्मदिवस साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक
११ क्टोबर  १९४२
:
अमिताभ बच्‍चन यांचा जन्मदिवस चित्रपट अभिनेता व निर्माता
११ क्टोबर  १९४३
:
कीथ बॉईस यांचा जन्मदिवस वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू: ११ आक्टोबर १९९६)
११ क्टोबर  १९४६
:
विजय भटकर यांचा जन्मदिवस संगणकतज्ञ ? ’सी. डॅकया प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे?
११ क्टोबर  १९५१
:
मुकूल आनंद यांचा जन्मदिवस  तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
११ क्टोबर १९६८
:
माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजयांचा मृत्यूईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांनाराष्ट्रसंतअसे संबोधले जाते. ग्रामगीताहा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
११ क्टोबर १९८४
:
खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडूरांगणेकरआक्रमक डावखुरे फलंदाज .
११ क्टोबर १९९४
:
दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर यांचा मृत्यू उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक .
११ क्टोबर १९९६
:
कीथ बॉईस यांचा मृत्यू  वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ आक्टोबर १९४३)
११ क्टोबर १९९७

११ ऑक्टोबर १९९९
:

:
विपुल कांति साहा यांचा मृत्यू आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य.
प्रा. गुंथर ब्लोबेल यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान. ते जर्मन सेल व मोलेक्युलर बायॅालॅाजिस्ट असून त्यांचा या क्षेत्रातील संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
११ क्टोबर १९९९
:
रमाकांत कवठेकर यांचा मृत्यू – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारीयांसारख्या पारितोषिक प्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक
११ क्टोबर  २००१
:
सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रक्कमेचे हे बक्षीस आहे.
११ क्टोबर २००२
:
दीना पाठक यांचा मृत्यूअभिनेत्री

१२ ऑक्टोबर
१२ ऑक्टोबर : जागतिक संधिवात निवारण दिन, जागतिक स्पॅनिश भाषा दिवस, जागतिक दृष्टी   दिन, आंतरराष्ट्रीय दशक दिन.






१२ ऑक्टोबर १४९२
:
ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.
१२ ऑक्टोबर १६०५
:
बादशाह अकबर यांचा मृत्यू हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट
१२ ऑक्टोबर १८५०
:
अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.
१२ ऑक्टोबर १८७१
:
भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्टया कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
१२ ऑक्टोबर १९११
:
विजय मर्चंट यांचा जन्मदिवस क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक
१२ ऑक्टोबर १९१८
:
मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्मदिवस उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील चेपॉकस्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
१२ ऑक्टोबर १९२१
:
जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्मदिवस संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष  व केसरीचे संपादक.
१२ ऑक्टोबर १९२२
:
शांता शेळके यांचा जन्मदिवस शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ‘मेघदूतआणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला.वडीलधारी माणसेहे व्यक्तिचित्रण गोंदण’, ‘वर्षा’, ’रुपसीइ. काव्यसंग्रह, ‘रंगरेषा’, ‘आनंदाचे झाडइ. ललित लेखसंग्रह, ‘धूळपाटीहे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
१२ ऑक्टोबर १९४६
:
अशोक मांकड यांचा जन्मदिवस क्रिकेटपटू
१२ ऑक्टोबर १९६५
:
पॉल हर्मन म्युलर यांचा मृत्यू डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ.
१२ ऑक्टोबर १९६७
:
डॉ.राम मनोहर लोहिया  यांचा मृत्यू समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.
१२ ऑक्टोबर १९६८
:
मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१२ ऑक्टोबर १९८३
:
लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.
१२ ऑक्टोबर १९८८
:
जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
१२ ऑक्टोबर १९९६
:
रेने लॅकॉस्त यांचा मृत्यूफ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ‘पोलोटी शर्टचे जनक
१२ ऑक्टोबर १९९८
:
तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून ‘इंटरनॅशनल वूमन मास्टरहा किताब मिळवला.
१२ ऑक्टोबर २०००
:
भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ‘सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कारजाहीर
१२ ऑक्टोबर २००१
:
संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.
१३ ऑक्टोबर







१३ ऑक्टोबर १२४०
:
रझिया सुलतान यांचा मृत्यू भारतातील पहिली महिला राज्यकर्ती.
१३ ऑक्टोबर १८७७
:
भुलाभाई देसाई यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे गांधी-आयर्विनकराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.
१३ ऑक्टोबर १८८४
:
लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१३ ऑक्टोबर १९११
:
अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' यांचा जन्मदिवसचित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या.
१३ ऑक्टोबर १९११
:
मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' यांचा जन्मदिवसस्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव निवेदिता’ ठेवले.
१३ ऑक्टोबर १९२३
:
मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.
१३ ऑक्टोबर १९२५
:
मार्गारेट थॅचर यांचा जन्मदिवस ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
१३ ऑक्टोबर १९२९
:
पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. त्यासाठी सत्याग्रह झाला होता.
१३ ऑक्टोबर १९४१
:
जॉन स्‍नो यांचा जन्मदिवस इंग्लिश क्रिकेटपटू
१३ ऑक्टोबर १९४४
:
दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१३ ऑक्टोबर १९४५
:
मिल्टन हर्शे  यांचा मृत्यू – ’द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक.
१३ ऑक्टोबर १९४६
:
फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१३ ऑक्टोबर १९७०
:
फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१३ ऑक्टोबर १९८७
:
आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा मृत्यू पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली.
१३ ऑक्टोबर १९९५
:
डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचलयांचा मृत्यू हिन्दी साहित्यिक.
१३ ऑक्टोबर २००१
:
डॉ. जाल मिनोचर मेहता यांचा मृत्यू कुष्ठरोगतज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक, पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे संचालक,





१४ ऑक्टोबर

१४ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय मानक दिवस, जागतिक दृष्टी दिन




१४ ऑक्टोबर १५४२
:
अकबर यांचा जन्मदिवस तिसरा मुघल सम्राट

१४ ऑक्टोबर १६४३
:
बहादूरशाह जफर (पहिला) यांचा जन्मदिवस मुघल सम्राट

१४ ऑक्टोबर १७८४
:
फर्डिनांड (सातवा) यांचा जन्मदिवस स्पेनचा राजा

१४ ऑक्टोबर १८८२
:
इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्मदिवस आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष 

१४ ऑक्टोबर १८९०
:
ड्वाईट आयसेनहॉवर यांचा जन्मदिवस अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष

१४ ऑक्टोबर १९१९
:
जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा मृत्यू जर्मन उद्योगपती
१४ ऑक्टोबर १९२०
:
ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.

१४ ऑक्टोबर १९२४
:
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्मदिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक

१४ ऑक्टोबर १९२७
:
रॉजर मूर यांचा जन्मदिवस जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता

१४ ऑक्टोबर १९३१
:
निखिल बॅनर्जी यांचा जन्मदिवस मैहर घराण्याचे सतारवादक

१४ ऑक्टोबर १९३३
:
राष्ट्रसंघातुन (League of Nations) नाझी जर्मनीने अंग काढुन घेतले.

१४ ऑक्टोबर १९३६
:
सुभाष भेंडे यांचा जन्मदिवस लेखक

१४ ऑक्टोबर १९४४
:
एर्विन रोमेल यांचा मृत्यू जर्मन सेनापती
१४ ऑक्टोबर १९४७
:
चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून पहिले यशस्वी स्वनातीत (ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.

१४ ऑक्टोबर १९४७
:
साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेबकेळकर यांचा मृत्यू लोकमान्य टिळक तुरुंगात असल्यामुळे त्यांनी १८९७ पासून केसरीमराठाचे संपादन केले. कायदेमंडळाचे सभासद, दहा नाटके, आठ कादंबर्‍या, दोन कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, आठ चरित्रात्मक ग्रंथ आणि विवेचनात्मक ग्रंथ इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
१४ ऑक्टोबर १९५३
:
रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे  यांचा मृत्यू  समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र
१४ ऑक्टोबर १९५५
:
उस्ताद शाहिद परवेझ  यांचा जन्मदिवस इटावा घराण्याचे सतारवादक

१४ ऑक्टोबर १९५६
:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

१४ ऑक्टोबर १९८१
:
अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्‍नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.

१४ ऑक्टोबर १९८२
:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

१४ ऑक्टोबर १९९३
:
लालचंद हिराचंद दोशी यांचा मृत्यू वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष, पद्मश्री (१९९२)
१४ ऑक्टोबर १९९४
:
सेतू माधवराव पगडी यांचा मृत्यू इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्सचे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले.जीवनसेतूहे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१४ ऑक्टोबर १९९७
:
हेरॉल्ड रॉबिन्स यांचा मृत्यू अमेरिकन कादंबरीकार
१४ ऑक्टोबर १९९८
:
विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

१४ ऑक्टोबर १९९८
:
डॉ. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट यांचा मृत्यू वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व संशोधक
१४ ऑक्टोबर १९९९
:
ज्यूलिअस न्येरेरे यांचा मृत्यू टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१४ ऑक्टोबर २००४
:
दत्तोपंत ठेंगडी यांचा मृत्यू स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक
१४ ऑक्टोबर २०१३
:
मोहन धारिया यांचा मृत्यू केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते





१५ ऑक्टोबर

१५ ऑक्टोबर : जागतिक अंध दिन, जागतिक खाद्य दिवस.









१५ ऑक्टोबर १५४२
१५ ऑक्टोबर १६०५
:
:
बादशाह अकबर यांचा जन्मदिवस हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट
 दिल्लीचा प्रसिध्द सम्राट अकबर यांचे निधन.  
१५ ऑक्टोबर १६०८
:
इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्मदिवस इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक
१५ ऑक्टोबर १७८९
:
रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचा मृत्यू उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात १५७१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते.
१५ ऑक्टोबर १८८१
:
पी. जी. वूडहाऊस  यांचा जन्मदिवस इंग्लिश लेखक
१५ ऑक्टोबर १८८८
:
गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘सुधारकपत्राची सुरूवात.
१५ ऑक्टोबर १९०८
:
जे. के. गालब्रेथ  यांचा जन्मदिवस कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
१५ ऑक्टोबर १९१७

१५ ऑक्टोबर १९१८
:

:
पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
  शिर्डीचे सुप्रसिध्द संत श्री साईबाबा यांनी समाधी घेतली.
१५ ऑक्टोबर १९२०
:
मारिओ पुझो यांचा जन्मदिवसअमेरिकन लेखक
१५ ऑक्टोबर १९२६
:
नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्मदिवस कवी
१५ ऑक्टोबर १९३१
:
अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वीभारतरत्‍नहा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकिर हुसेन (१९६३) या भारतरत्‍न मिळालेल्या व्यक्ति पुढे राष्ट्रपती झाल्या.
१५ ऑक्टोबर १९३४
:
एन. रामाणी यांचा जन्मदिवस कर्नाटिक शैलीचे बासरीवादक
१५ ऑक्टोबर १९३५
:
टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडियाही कंपनी अस्तित्त्वात आली.
१५ ऑक्टोबर १९४६
:
हर्मन गोअरिंग यांचा मृत्यू जर्मन नाझी
१५ ऑक्टोबर १९४९
:
प्रणोय रॉय यांचा जन्मदिवस पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक
१५ ऑक्टोबर १९५७
:
मीरा नायर यांचा जन्मदिवस भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
१५ ऑक्टोबर १९६१
:
सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला यांचा मृत्यूहिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ‘सरोजस्मृतीया शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते.
१५ ऑक्टोबर १९६९
:
पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्मदिवस मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक
१५ ऑक्टोबर १९९३



१५ ऑक्टोबर १९९४
:



:
वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण अफ्रिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्‍नांबद्दल अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर
आय.आर.एस.पी.-२ या भारतीय उपग्रहाचे श्री हरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण.
१५ ऑक्टोबर १९९७
:
भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जया कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कारमिळाला.
१५ ऑक्टोबर २००२
:
वसंत सबनीस  यांचा मृत्यू लेखक व पटकथाकार




No comments:

Post a Comment